आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वीचा मिनी लिलाव यंदा गोव्यात 15 ते 16 डिसेंबरच्या आसपास होण्याची शक्यता आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंह धूमल यांनी ही माहिती दिली. गेली तीन वर्षे ही प्रक्रिया दुबई, जेद्दा आणि अबू धाबीत झाली होती; यंदा भारतात करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. मिनी लिलाव असल्याने बोली एका दिवसात संपेल आणि दहा फ्रेंचायझी संघातील रिकाम्या जागा भरतील.
आयपीएल 2027 मिनी लिलाव गोव्यात, 15-16 डिसेंबरला
Source: Prahaar