पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये नॅशनल सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एजेन्सीने गेल्या 24 तासांत तीन अवैध कॉल सेंटर्सवर छापे टाकून 212 जणांना ताब्यात घेतले, ज्यात 7 चिनी नागरिकांचा समावेश आहे. कारवाईत 306 मोबाइल फोन, 383 संगणक-सीपीयू आणि 299 मॉनिटर-लॅपटॉप जप्त करण्यात आले. चौकशीत भारत आणि ब्राझीलपर्यंतचे नेटवर्कचे दुवे समोर आले असून, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे नवे केंद्र ठरत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
इस्लामाबादमध्ये तीन अवैध कॉल सेंटरवर छापा, 212 ताब्यात
Source: Tarun Bharat