अभिनेता अजय देवगण यांच्या जुहूतील मालमत्तेत सलून आणि स्पा सुरू करण्याच्या कामावर मुंबई महापालिकेच्या के-वेस्ट विभागाने स्टॉप वर्क नोटीस बजावली आहे. कपोळ को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील रहिवाशांनी व्यावसायिक वापरावर आक्षेप नोंदवल्यानंतर ही कारवाई झाली. आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या सादर न केल्याने नोटीस देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. देवगण कुटुंबाने मात्र नियमानुसार परवानग्या घेतल्याचा दावा करत चार आठवड्यांची मुदत मागितली आहे.
अजय देवगणच्या जुहू बंगल्यावर BMCची स्टॉप वर्क नोटीस
Source: Lokshahi Marathi