नवी मुंबईतील बेलापूर येथे गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पारसिक हिल टेकडीवरून एक कार खाली कोसळून बेलापूर-उरण रेल्वे मार्गिकेवर आदळली. या घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मार्गिकेवर उपनगरीय लोकल नसल्याने मोठी दुर्घटना टळली, तरीही वाहतूक खंडित करण्यात आली असून पोलिस व रेल्वे प्रशासन चौकशी करत आहे.
बेलापूर-उरण रेल्वे मार्गावर कार कोसळली, वाहतूक विस्कळीत
Source: Prahaar