पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या आवारात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा व बँड वाजवल्याप्रकरणी १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर पोलिसांनी दोन महिला डॉक्टरांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालय परिसर शांतता क्षेत्र असल्याने परवानगी न घेता वाद्ये वाजवल्याचा आरोप आहे.
वायसीएम रुग्णालयात ढोल-ताशा वादन; १३ जणांना नोटीस, ६ जणांवर गुन्हा
Source: Sarkarnama