तामिळनाडूच्या मयिलाडुथुराई जिल्ह्यातील पुम्पुहार येथे समुद्रतळावर सुरू असलेलं तिसऱ्या टप्प्यातील उत्खनन २२ सप्टेंबर रोजी पूर्ण झालं. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत २५० हून अधिक पुरातत्त्वीय वस्तू सापडल्या आहेत. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील समृद्ध बंदर शहर असलेल्या पुम्पुहारचा उल्लेख संगम साहित्यात आणि शिलप्पदिकारमसारख्या महाकाव्यांमध्ये आढळतो.
पुम्पुहार समुद्रतळ उत्खनन पूर्ण; २५० हून अधिक अवशेष सापडले
Source: BBC Marathi