वाढते प्रदूषण लक्षात घेता अनेक भक्त आता घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन करत आहेत. शाडूच्या मातीची मूर्ती स्वच्छ पाण्याच्या टबमध्ये विसर्जित करून ती माती कुंडीत किंवा बागेत वापरता येते. पीओपी मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने जलप्रदूषण होते, तर शाडूची माती काही तासांतच निसर्गात विलीन होते.
घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची शास्त्रोक्त पद्धत
Source: Marathi OneIndia