छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४३ व्या वार्षिक सभेत ८३४ कोटी रुपयांच्या अनिष्ट तफावतीच्या मुद्द्यावरून सभासदांनी प्रशासनाला धारेवर धरले. मागील सभेच्या ठराव इतिवृत्तात न नोंदवल्याचा आरोप करत माजी संचालक कृष्णा पाटील डोणगावकर यांनी बँक नफ्यात नसून ८१३ कोटींच्या तोट्यात असल्याचा दावा केला. निवडणूक आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय घेतले गेले नाहीत.
जिल्हा बँकेच्या सभेत ८३४ कोटींच्या तफावतीवरून गदारोळ
Source: Sarkarnama