नानी अभिनीत ‘द पॅराडाईज’च्या बॉक्स ऑफिस कमाईत शुक्रवारी मोठी घसरण झाली. पहिल्या दिवशी 34.65 कोटी रुपये निव्वळ कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी केवळ 14.90 कोटी रुपयांची कमाई झाल्याचे प्राथमिक आकडे आहेत. समीक्षक व प्रेक्षकांकडून मिळालेल्या संमिश्र प्रतिक्रियांमुळे कमाईवर परिणाम झाल्याचे मानले जाते. चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 97.50 कोटी रुपयांवर पोहोचली असून बजेट सुमारे 200 कोटी रुपये आहे.
‘द पॅराडाईज’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घसरण
Source: Prahaar