अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आश्रमशाळेत पाचवीच्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत विद्यार्थिनी प्रिया मावसकर ही धारणी तालुक्यातील मेळघाट परिसरातील रहिवासी होती. मृत्यूनंतर शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार केल्यामुळे पालक आणि आदिवासी संघटनांनी संशय व्यक्त करत पोलीस व आदिवासी विकास विभागाकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
अमरावतीत आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू; चौकशीची मागणी
Source: Lokshahi Marathi