पश्चिम नेपाळमधील हिमलुंग हिमाल बेस कॅम्पवर रविवारी सकाळी झालेल्या हिमस्खलनात किमान १० जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्तांमध्ये दोन स्वयंपाकी कर्मचाऱ्यांचा समावेश असून, सर्वजण ट्रेकिंग व पर्वतारोहण कंपन्यांशी संबंधित आहेत. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत असून, प्रशासनाने हाय अलर्ट जारी करून मोहिमा थांबवण्याचे आवाहन केले आहे.
नेपाळमधील हिमलुंग हिमाल बेस कॅम्पवर हिमस्खलन, १० बेपत्ता
Source: Prahaar