अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत संगमनेर येथील सर्वपक्षीय बैठकीत प्राथमिक सहमती झाली. समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात आली. 21 संचालकपदांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज सुरू असून 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जनरल प्रवर्गातील सात जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत सहमतीचा फॉर्म्युला ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता
Source: Deshdoot