बीबीसीच्या रिपोर्टनंतर गुजरातमधील कागदावरच अस्तित्वात असलेल्या सहा राजकीय पक्षांविरोधात गांधीनगर सीआयडीने एफआयआर दाखल केली आहे. 2023-24 मध्ये या पक्षांना 1,700 कोटी रुपयांहून अधिक निधी मिळाला होता. भारतीय नॅशनल दल, गरीब कल्याण पार्टी आणि स्वतंत्रता अभिव्यक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. खोटी कागदपत्रे सादर करून करचोरी केल्याचा आरोप आहे. अद्याप कोणतीही अटक झालेली नाही.
गुजरातमधील सहा पक्षांविरोधात सीआयडीची एफआयआर
Source: BBC Marathi