नालासोपाऱ्यात एका व्यावसायिकाला मारहाण करून त्याच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आरशाद चौधरी आणि तीन महिलांविरोधात पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून चौधरी यांनी महिलांना कार्यालयात पाठवून व्यावसायिक फैजान शेख यांना मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण समोर आले असून पोलिस तपास करत आहेत.
नालासोपाऱ्यात व्यावसायिकाला मारहाण; BVA नगरसेवकाविरोधात गुन्हा
Source: Lokshahi Marathi