गोरेगाव (पूर्व) येथील राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात केमिकलच्या उग्र वासाने गुदमरून प्रभाकर धनीवर (२४) आणि भाविन देसाई (१८) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. जवळच्या इलेक्ट्रोप्लेटिंग कारखान्यातून ड्रेनेजमध्ये केमिकल सोडल्याचा संशय असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घटनास्थळी हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण सुरू केले आहे.
मुंबईत सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती, दोन तरुणांचा मृत्यू
Source: Asianet Marathi