जागतिक भू-राजकीय तणाव, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकन बॉण्ड यील्डमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स १,१२४.०२ अंकांनी घसरून ७२,७७१.७२ वर, तर निफ्टी ३६०.२५ अंकांनी घसरून २२,७८०.२५ वर बंद झाला. बीएसईवरील कंपन्यांच्या बाजारमूल्यात सुमारे ८ लाख कोटी रुपयांची घट झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी २९ शेअर्स लाल निशाणात बंद झाले.
शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स १,१२४ अंकांनी कोसळला
Source: Deshdoot