पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर, भीमा आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमेश्वरमध्ये पवार विरुद्ध पवार लढत, भीमामध्ये आमदार राहुल कुल विरुद्ध माजी आमदार रमेश थोरात तर कर्मयोगीत भरणे-पाटील समीकरणाची कसोटी लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १४ कारखान्यांच्या संचालक मंडळांवरील वर्चस्व ग्रामीण राजकारणातील ताकद ठरवते.
पुण्यातील साखर कारखाना निवडणुकांना वेग
Source: Sarkarnama