जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्याला राजकीय वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दौऱ्यात एक आरोपी सोबत असल्याचा दावा करत तो शिंदे गटाचा पदाधिकारी असल्याचा नवीन आरोप केला आहे. दरम्यान, कोरडा दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने ठाकरे सेनेने नांदेडच्या देगलूरमध्ये जीआरची होळी करून आंदोलन केले.
मंत्री गुलाबराव पाटलांच्या दुष्काळी दौऱ्यात गुन्हेगारांचा वावर
Source: Sarkarnama