अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिवसेना आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे. बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, संचालक मंडळाचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपत असून प्रशासकराजाची शक्यता आहे.
अमरावती जिल्हा बँक चौकशीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Source: Sarkarnama