१ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात शहरानुसार ६० ते ७० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दिल्लीत ६२.५० रुपयांनी वाढून दर २,८१० रुपये, तर मुंबईत २,७६७ रुपये झाले आहेत. सणासुदीच्या तोंडावर ही वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सचा खर्च वाढणार आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरचे दर देशभर स्थिर आहेत.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ, घरगुती दर स्थिर
Source: Asianet Marathi