पिंपरी-चिंचवडच्या स्पाईन रोडवरील सयाजी हॉटेल समोर ३० सप्टेंबर रोजी दुपारी धावत्या दुचाकीतून अचानक धूर निघून आग लागली. चालकाने वेळीच वाहन थांबवल्याने जीवितहानी टळली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. वायरिंगमधील शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज असून, वाहतूक पोलिसांनी वाहनांची नियमित सर्व्हिसिंग करण्याचे आवाहन केले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या दुचाकीला आग
Source: Lokshahi Marathi