उत्तर प्रदेशातील बिजनौरजवळील एका गावात भाडेकरू महिलेशी जवळीक झाल्यानंतर दोन चुलत भावांचा एचआयव्ही संसर्गाने मृत्यू झाला. 51 वर्षीय मोठ्या भावाचा तीन दिवसांपूर्वी, तर 43 वर्षीय चुलत भावाचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान अंत झाला. महिला घर सोडून गेल्यानंतर दोघांचीही प्रकृती खालावली होती. गावात भीतीचे वातावरण असून आरोग्य विभागाने समुपदेशन व तपासणी मोहीम सुरू केली आहे.
बिजनौरमध्ये दोन चुलत भावांचा एचआयव्हीने मृत्यू
Source: Jai Maharashtra News