खोकताना, शिंकताना, हसताना किंवा व्यायाम करताना लघवी गळण्याची समस्या अनेक महिलांमध्ये आढळते, मात्र लाजेमुळे त्या यावर बोलत नाहीत. गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत होतात. याला स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिनेन्स म्हणतात. तज्ज्ञांनुसार हे वयामुळे होणारे सामान्य लक्षण नसून योग्य निदान आणि उपचारांनी ते नियंत्रणात आणता येते.
लघवी गळण्याची समस्या महिलांमध्ये दुर्लक्षित, उपचार शक्य
Source: BBC Marathi