अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील विविध शाळांतील सुमारे ३५० युवा मल्ल सहभागी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या फ्रीस्टाईल तसेच ग्रीकोरोमन सामने होणार असून विजेत्यांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत संधी मिळेल.
साताऱ्यात जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला सुरुवात
Source: Lokshahi Marathi