दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विस्तारासाठी मानखुर्द येथील सुमारे १४ एकर जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला बाह्य चित्रकरणासाठी देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या निर्णयामुळे चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
मानखुर्दमध्ये १४ एकरांवर नवीन फिल्म सिटी
Source: Prahaar