मुंबईत शुक्रवारी होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या 'जेल भरो' आंदोलनाला गायक विशाल ददलानी यांनी पाठिंबा दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील गेट क्रमांक ६ येथे दुपारी ४ वाजता आंदोलन सुरू होणार आहे. ददलानी यांनी 'Go Gyanu Go' घोषणा देत नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले असून CJPने मुंबईपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.
विशाल ददलानींचा CJPच्या 'जेल भरो' आंदोलनाला पाठिंबा
Source: Lokshahi Marathi