मुंबईतील जेजे रुग्णालय परिसरातील १० मजली सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन होऊन सात वर्षे उलटली, तरी ते अद्याप रुग्णसेवेसाठी सुरू झालेले नाही. ७७८.६५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे बांधकाम बहुतांश पूर्ण असूनही भोगवटा प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा, लिफ्ट व सरकते जिने यांसारखी कामे प्रलंबित आहेत. कोविडमुळे झालेला विलंब आणि गेट क्रमांक दोनजवळील १७० अतिक्रमणे यामुळे रुग्णांची प्रतीक्षा वाढली आहे.
जेजे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सात वर्षांनंतरही बंद
Source: Pudhari