कच्छ (पूर्व) वन विभागाचे वन अधिकारी जयेश दुमादिया यांना 6 सप्टेंबरला पाकिस्तान सीमेजवळील काळो डुंगर परिसरात पेट्रोलिंगदरम्यान अत्यंत दुर्मिळ 'एफ्रो-एशियन सँड स्नेक' आढळला. शास्त्रीय नाव 'सॅमोफिस स्कोकारी' असलेला हा वाळवंटी साप गुजरातमध्ये अतिशय दुर्मिळ मानला जातो. 1871-72 मध्ये फर्डिनांड स्टोलिक्झा यांनी कच्छमध्ये याच प्रजातीचा नमुना गोळा केल्याची नोंद आहे.
कच्छमध्ये दुर्मिळ 'एफ्रो-एशियन सँड स्नेक' आढळला
Source: BBC Marathi