मुंबई महापालिकेने रस्ते खोदाई व पुनर्भरणासाठी सुधारित धोरण २०२६ जाहीर केले आहे. सिमेंट काँक्रिट रस्त्यांवर खोदाईसाठी डायमंड कटरचा वापर बंधनकारक करण्यात आला असून, पुनर्भरण हमी कालावधी सिमेंटसाठी दहा वर्षे व डांबरीसाठी पाच वर्षे करण्यात आला आहे. उपयोगिता संस्थांना भूमिगत वाहिन्या टाकण्यास परवानगी देण्यात येणार असून, अटींचे उल्लंघन केल्यास पुढील खोदाईस परवानगी नाकारली जाईल. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी होईल.
मुंबईत रस्ते खोदाईसाठी नवीन धोरण; डायमंड कटर बंधनकारक
Source: Prahaar