धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. नियमानुसार कारवाई करून प्रशासनाने यावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. हलगर्जीपणा, संगनमत किंवा सहभाग आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.
धुळ्यात अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाईचे निर्देश
Source: Lokshahi Marathi