वर्तमानपत्र किंवा छापील कागदात गुंडाळून समोसा, भजी यांसारखे गरम पदार्थ देणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे FSSAI ने म्हटले आहे. छपाईच्या शाईत शिसे व घातक रसायने असतात, जी गरम अन्नात मिसळून यकृत, मेंदू आणि इतर अवयवांवर परिणाम करू शकतात. गर्भवती महिला व लहान मुलांना विशेष धोका असून, फूड-ग्रेड पॅकेजिंगच वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्तमानपत्रात गुंडाळलेले गरम अन्न आरोग्यास घातक; FSSAI चा इशारा
Source: BBC Marathi