दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामीण महिला बचत गटांचे कर्ज माफ करण्याची मागणी शेतकरी संघटना महिला आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सुनीता वानखडे यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिले. कर्जमाफी शक्य नसल्यास १२ ते २४ महिने हप्ते वसुली स्थगित, व्याजात सवलत आणि कर्ज पुनर्रचनेची मागणीही करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्त महिला बचत गटांसाठी कर्जमाफीची मागणी
Source: Sarkarnama