महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जलाशयांतील पाणीसाठा घटल्याने मत्स्य व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी वाशिममध्ये आढावा बैठक घेत मच्छीमारांना अधिकाधिक मदत देण्याची तसेच जलाशयांतील गाळ काढण्यासाठी राज्यव्यापी कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली. संबंधित यंत्रणांनी दोन आठवड्यांत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
दुष्काळामुळे मत्स्य व्यवसाय संकटात; राणेंचा विदर्भ दौरा
Source: Prahaar