अन्न-औषध प्रशासनाने मुंबई, पुणे, सोलापूर आणि कोकण विभागात धडक कारवाई करत ९४.४५ लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा आणि ३५ लाखांची वाहने जप्त केली. एकूण १.२९ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करून तीन एफआयआर दाखल आणि पाच आरोपींना अटक करण्यात आली. केळी व दूध भेसळीचे प्रकार उघडकीस आले असून ११ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
एफडीएची राज्यभर धडक कारवाई; १.२९ कोटींचा मुद्देमाल जप्त
Source: Prahaar