शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा भक्कम बचाव केला. वकील नीरज कौल यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांच्या कायदेशीर अखत्यारीतच असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरील आरोप फेटाळून लावले असून, 2011 ची पक्षघटनाच अधिकृत असल्याचा दावा केला.
शिवसेना चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद
Source: Jai Maharashtra News