मतदार यादीतील SIR प्रक्रियेला विरोध आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, संजय राऊत यांसह अनेक विरोधी नेत्यांनी ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधींनी लोकांचा आवाज दाबता येणार नाही, असे सांगत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला.
निवडणूक आयोगावर मोर्चा; राहुल, प्रियांका ताब्यात
Source: Asianet Marathi