त्रिपुरा सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. मुख्यमंत्री माणिक साहा आणि अर्थमंत्री प्रणजीत सिंग रॉय यांच्या उपस्थितीत 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे महागाई भत्ता 44 टक्क्यांवर पोहोचला असून घरभाडे भत्ताही मूळ वेतनाच्या 8 वरून 10 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. वाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे 300 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
त्रिपुरा सरकारचा कर्मचाऱ्यांना दसरा-दिवाळीपूर्वी मोठा दिलासा
Source: Jai Maharashtra News