सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या चर्चेत असलेले भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी आपण चेअरमन होणार नसल्याचे स्पष्ट केले. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भेटीनंतर ते बोलत होते. बँकेची वसुली शंभर टक्के व्हावी आणि एका कारखान्याला ३०० कोटींचे कर्ज देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूर डीसीसी बँकेचे चेअरमन होणार नाही: राजेंद्र राऊत
Source: Sarkarnama