उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबाबत सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यावरून भाजप पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली असून पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली आहे.
उल्हासनगरमध्ये महापौरांच्या पतीविरोधात भाजपची तक्रार
Source: Jai Maharashtra News