बीसीसीआयने स्मृती मंधानाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पूर्णवेळ व्हाईट-बॉल कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. हरमनप्रीत कौरने ६ ऑक्टोबरला कर्णधारपद सोडल्यानंतर ही घोषणा झाली. मंधानाच्या नेतृत्वाखालील पहिली मालिका झिम्बाब्वेविरुद्ध असून १६ ऑक्टोबरपासून रायपूरमध्ये तीन टी२०आय आणि २३ ऑक्टोबरपासून वडोदरा येथे तीन वनडे सामने खेळले जातील. टी२०आयची उपकर्णधार शेफाली वर्मा तर वनडेची उपकर्णधार दीप्ती शर्मा असेल.
स्मृती मंधाना भारतीय महिला संघाची नवी व्हाईट-बॉल कर्णधार
Source: Lokshahi Marathi