रोज एक पूर्ण अंडे खाल्ल्यास शरीराला १३ आवश्यक जीवनसत्त्वे व पोषक घटक मिळतात. अनेक जण कोलेस्ट्रॉलच्या भीतीने पिवळा बलक टाळतात, मात्र त्यातच व्हिटॅमिन ए, डी, ई, के, बी जीवनसत्त्वे तसेच लोह, कॅल्शियम, झिंक व फोलेट भरपूर असते. पांढऱ्या भागात फक्त प्रथिने असतात. योग्य प्रमाणात पूर्ण अंडी खाणे व नियमित व्यायाम हेच आरोग्यासाठी चांगले.
अंड्याचा पिवळा बलक फेकू नका, आरोग्यासाठी महत्त्वाचा
Source: Asianet Marathi