ज्येष्ठ नाटककार, लेखिका व दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा प्रतिष्ठित 'विष्णुदास भावे गौरव पदक' पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनानिमित्त सांगली येथे नाट्य संमेलनाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाईल. पदक, ३० हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सई परांजपे यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर
Source: Prahaar