मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून माहिती-जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी निर्मित 'पंढरपूर वारी- इन द फूट स्टेप्स ऑफ द सेंट्स' या २२ मिनिटांच्या इंग्रजी माहितीपटाची 'एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६'मध्ये 'सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम' श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा भक्ती, समता व बंधुभावाचा संदेश जागतिक पटलावर पोहोचवणारा हा माहितीपट डिस्कवरीच्या जगभरातील वाहिन्यांवर प्रसारित झाला आहे.
पंढरपूर वारी माहितीपटाला आशियाई पुरस्कार
Source: Prahaar