इटलीतील नामांकित वाइन कंपनी मार्केसी अँटिनोरीच्या टस्कनी गोदामातून चोरट्यांनी 30 हजार वाइन बाटल्या चोरल्या. सुमारे 50 लाख युरो (54 कोटी रुपये) किमतीच्या या चोरीत मास्कधारी चोरट्यांनी अलार्म बंद करून सीसीटीव्ही निष्क्रिय केले आणि फोर्कलिफ्टच्या साहाय्याने दोन ट्रक भरून बाटल्या नेल्या. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेन्झो कोटारेला यांनी याला इटलीतील आतापर्यंतची सर्वात मोठी वाइन चोरी म्हटले आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
इटलीत 30 हजार वाइन बाटल्यांची 54 कोटींची चोरी
Source: BBC Marathi