अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात प्रतिबंधित व भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात मोहीम राबवत १ कोटींहून अधिक किमतीचा साठा जप्त केला. नाशिक, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावतीत कारवाई झाली; १२ एफआयआर दाखल होऊन १३ जणांना अटक झाली. मुंबईतील १० आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. नागपुरात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससोबत २२ लाखांचा औषध साठा जप्त झाला.
एफडीएची राज्यभर धडक कारवाई; १ कोटींहून अधिकचा साठा जप्त
Source: Prahaar