मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनाचं नेतृत्व आता CJPचे महाराष्ट्रातील नेते अजिंक्य शिंदे करत आहेत. CJPचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतल्यानंतर शिंदे यांनी आंदोलन पुढे सुरू ठेवण्याची भूमिका मांडली. मतदार यादीतील कथित अनियमितता आणि आंदोलकांवरील कारवाईवरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम
Source: Lokshahi Marathi