लॅपटॉप टेबलावर ठेवून काम केल्याने मान ४५ ते ६० अंशांपर्यंत झुकते आणि मानेवर २७ किलोपर्यंत दाब पडतो. यामुळे 'टेक नेक' हा नवा आजार बळावत असून सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस, स्लिप डिस्क आणि मणक्याच्या कायमस्वरूपी नुकसानीचा धोका निर्माण होतो. स्क्रीन डोळ्यांच्या रेषेत ठेवणे, योग्य बसण्याची पद्धत आणि दर ३० मिनिटांनी ३० सेकंदांचा ब्रेक घेणे हे उपाय डॉक्टर सुचवतात.
लॅपटॉपवर दिवसभर काम करणाऱ्यांना 'टेक नेक'चा धोका
Source: Asianet Marathi