कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची रविवारी दिल्लीतील एसीएम न्यायालयाने सुटका केली. शनिवारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीतील निर्बंधांविरोधात सर्वोच्च न्यायालयात रविवारी सुनावणी होणार आहे.
दिल्लीत सीजेपी आंदोलकांची सुटका, मुंबईतही धरपकड
Source: Mumbai Tak