मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात ६५ दिवसांपासून पाऊस नसल्याने खरीप हंगामातील ७.४२ लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली असून १,३५३ गावांतील सुमारे ८.२२ लाख शेतकरी नुकसानग्रस्त झाले आहेत. सोयाबीनचे उत्पादन एकरी ५० किलोवर घसरले असून चाऱ्याची किंमत ४,००० रुपये प्रति टन झाली आहे. केवळ १० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून केंद्रीय पथकाने पाहणी केली.
बीडमध्ये दुष्काळाचा तीव्र फटका; ८ लाख शेतकरी बाधित
Source: Agrowon