स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तुटणाऱ्या उसाला प्रति टन साडेपाच हजार रुपये दर मिळावा, अशी मागणी केली. कारखानदारांनी पाच हजार आणि केंद्र सरकारने ५०० रुपये अनुदान द्यावे, असे त्यांनी सांगितले. साखरेला प्रतिकिलो ५० रुपये हमीभाव आणि इथेनॉलला ७० रुपये दर निश्चित न झाल्यास मंगळवारपासून महाराष्ट्र व कर्नाटकातील महामार्ग बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला.
ऊस दरासाठी शेट्टींचा इशारा; महामार्ग बंदची तयारी
Source: Agrowon